Blog

 

घर घ्यावे अभ्यासून

Posted on February 2, 2015 by घर घ्यावे अभ्यासून

घर घ्यावे अभ्यासून

आपल्या प्रत्येकाच्या मनात स्वतःचे घर असावे अशी ज़बरदस्त इच्छा असते. आपल्या मनात त्या बद्दल काही कल्पना पण असतात. परंतु जागेच्या प्रचंड वाढलेल्या किंमती, बिल्डिंग मटेरियल्सचे वाढलेले भाव  आणि एकूणच घराची किंमत बघूनच मन धसकून जाते. तरिही स्वतःची अशी हक्काची जागा घेण्यासाठी आपण जीव तोडून मेहनत करतो. थोडीशी पुंजी एकत्र झाली की लगेच बिल्डरकडे धाव घेतो. आपल्या  मनात असणारी घराबद्दलची कल्पना व बिल्डरचे व्यावसायिक आडाखे यांची कशीबशी सांगड जमवून आपण मनातले घर प्रत्यक्षात साकार करण्याच्या उद्योगाला लागतो. आपल्या बिल्डरला अनेक शंका व प्रश्न विचारून मनाची खात्री करून घेतो. पण एक प्रोफेशनल बिल्डर म्हणून आम्हाला पण एक सल्ला द्यावासा वाटतो. एखाद्या घरात तांत्रिकद्रुष्ट्या काय काय आवश्यक आहे याबद्दल तुम्ही जागरूक असले पाहिजे. आपल्या मनात खालील प्रश्न अवश्य आले पाहिजेत .

 

१  :  आवश्यक कायदेशीर कागदपत्रे मी घेतली आहेत ना ?

2 :  बिल्डर देत असलेल्या सर्व सुखसोयी मला खरंच हव्या आहेत
          ना ?

३ : एकूणच घर माझ्या लाइफ़ स्टाइलशी सुसंगत आहे ना?
     ते माझ्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक  मूल्यांचे प्रतिबिम्ब
     à¤†à¤¹à¥‡ का?  

४ : माझ्या स्वभावधर्माला अनुकूल व माझ्या जीवनपध्दतीला
          पोषक वातावरण देणारे माझे घर आहे ना? कारण ही निवड
          करण्याची  संधी मला बहुधा एकदाच मिळणार आहे.

५  :  मी पूर्णपणे समाधानी आहे ना?

हे सर्व प्रश्न विचारायचा तुम्हाला पूर्ण हक्क आहे, कारण तुमचे घर कुटुम्बियांशी व समाजाशी  असलेल्या बांधिलकीचे  प्रतिबिम्ब आहे.

Comments :-

No Comments yet.

Leave a Comment

Your email address will not be published. All fields are Required

Type the characters you see in the picture